IPS असलेल्या बहिणीनं दिलेली ‘जिद्द’ आणि लोकांचे ‘टोमणे’, यामुळेच बनली IAS अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिद्द असेल तर आभाळ देखील छोटं असतं. राजस्थानच्या एक मुलगी फक्त आपल्या हिम्मतीवर कलेक्टर बनली. 2012 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी निधी चौधरींची कथा देखील तशीच आहे. जी कोणालाही प्रेरणा देईल.

आरबीआयच्या मॅनेजर पदापासून आयएएस अधिकाऱ्यांपर्यंतचा प्रवास कसा होता ? –
निधी चौधरी यांनी सांगितले की हा अत्यंत अनोखा प्रवास राहिला. माझी लहान बहिण पहिल्यांदाच आयएएस परिक्षा पास झाली आहे. मी देखील बँक मॅनेजरच्या पदावर कार्यरत होते. माझ्या लहान बहिणीने मला खूप प्रोस्ताहन दिले आणि रात्रांदिवस अभ्यासाठी प्रेरणा दिली.

तुम्हाला आयएएस का बनायचे होते ? –
निधी यांनी सांगितले की – माझे लक्ष समाज सेवा करण्याचे होते. मी कोणत्याही परिस्थिती समाजासाठी काम करु इच्छित होते. बँक मॅनेजर असताना मी त्याचं दिशेने प्रयत्न करत राहिले परंतु आता आयएएस बनून या दिशेने योग्य काम करु शकत आहे.

एका मुलाची आई असताना या कठीन परिक्षेची तयारी करणं आणि त्यात सफल होणं किती अवघड होतं. निधी यांनी सांगितले की हो,अडचणी तर आल्या. परंतु माझ्या कुटूंबाने मला मदत केली. मला पुढे जाण्यासाठी प्रोस्ताहन दिलं. माझ्या पतीने माझ्या मुलाला संभाळलं.

तुम्ही मानतात का प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो ?-
निधी यांनी सांगितले की हो नक्कीच, जसे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसेच एका स्त्रीच्या यशामागे एक पुरुष असतो, माझं आयुष्य याचं उदाहरण आहे.

तुम्हाला कशामुळे जिद्द मिळाली ? –
निधी यांनी यावर बोलताना सांगितले की कधी घाबरायचे नाही, काहीतरी करुन दाखवाचं आहे याचा विचार असल्याचे माझी जिद्द वाढली. माझ्या आई वडीलांना मला आणि माझ्या बहिणीला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले.

लहान पणापासून काही गोष्टी ज्या कायम आठवतात ? –
निधी म्हणाल्या की, मी राजस्थानच्या एका छोट्या गावातून आले. मी अशा भागातून येते जेथे मुलींचा जन्म आणि पूर्ण जीवन अत्यंत कठीण असते. जेव्हा आमचे आई वडील आम्हाला शाळेत पाठवत असतं. तेव्हा लोक म्हणायचे की मुलींना किती शिकवणार, कलेक्टर बनवणार आहेत का, आणि आज पाहा मी कलेक्टर आणि माझी बहिण एसएसपी बनलो.

एखादा असे स्वप्न जे तुम्ही पूर्ण करु इच्छितात ? –
निधी म्हणाल्या की हो, मी एक अत्यंत मोठे स्वप्न पूर्ण करु इच्छित आहे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कोणताही मुलगा देशातील ट्राफिक सिग्नलवर तिरंगा विकताना दिसू नये. या सगळ्याने स्वतंत्र अपूर्ण वाटत.

महिलांना काय संदेश द्याल ? –
निधी म्हणाल्या की, आपल्या समाजात मुलींना सांगितले जाते की त्या कोणापेक्षा कमी नाहीत. त्यांची तुलना मुलांशी नाही झाली पाहिजे. देशातील परिस्थिती अशी आहे की ज्यात मुलींना वाटते की त्या सुरक्षित नाहीत. आपले संस्कार अशा हवेत की स्त्रीयांना कायम सुरक्षित वाटले पाहिजे. हे सर्व बदलले पाहिजे. हे बदल फक्त स्त्रीयाच करु शकतात.

आपण नऊ महिने आपल्या पोटात मुलं वाढवतो, त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना हे संदेश आणि ज्ञान केले की त्यांनी स्त्री पुरुष समानता मानावी. ऐवढेच नाही तर मुलींना पुढे जाऊन काही तरी करण्याची ताकद देखील द्यायला हवी. आपल्यातल्या शक्तीला विचारले पााहिजे. मुलींना ती शक्ती आपण दिली पाहिजे जी आजपर्यंत आपण त्यांना दिली नाही. जेव्हा असे होईल तेव्हा देशात दिवस असो वा रात्र महिलांनी सुरक्षित असतील.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/