Coronavirus : इराणमध्ये मृतदेहांना पुरण्यासाठी रातोरात भल्या मोठ्या मैदानात खोदले खड्डे, ‘सॅटेलाईट’मध्ये कैद झाले फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस विषयी भयानक चित्रे समोर येत आहेत. आतापर्यंत 4600 पेक्षा जास्त लोक मरण पावले असून 1.25 लाखाहून अधिक लोक या व्हायरमुळे संक्रमित आहेत. इराणमध्ये सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इराणच्या एका चित्राने सर्वांना चकित केले आहे. इराणमधील मृतदेह पुरण्यासाठी विस्तीर्ण मैदानात मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत, हे सॅटेलाईटच्या छायाचित्रांमधून दिसून येत आहे.

सॅटेलाईटच्या मदतीने कबरीची छायाचित्रे
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात कोरोना विषाणूची पहिली घटना समोर येताच इराणने मृतदेह दफन करण्यासाठी खड्डे खोदले. हे खड्डे दोन फुटबॉल मैदाना इतके आहेत. राजधानी तेहरानपासून सुमारे 120 किमी अंतरावर कॉम शहराजवळ या कबरी खोदल्या गेल्या. सॅटेलाईट मधून घेतलेल्या चित्रांमध्ये या कबरी स्पष्ट दिसत आहेत. इराणमधील सरकारी आकडेवारीनुसार, 10,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

काळ्या पिशव्या मध्ये मृतदेह
अलीकडे, इराणच्या अनेक शवागारांतून काळ्या पिशव्यात बंद अनेक मृतदेहांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. इराणमध्ये, इस्लामिक परंपरेनुसार, दफन करण्यापूर्वी मृतदेह साबण आणि पाण्याने धुतले जातात, परंतु कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केलेली मृतदेहांवर दफनाच्या वेळी कॅल्शियम ऑक्साईड वापरले जात आहेत. जेणेकरून त्याचा मातीवर परिणाम होणार नाही. या कारणास्तव, शवागारच्या बाहेर विषाणूची चाचणी करण्यात लागलेल्या वेळेमुळे, मृतदेशाचा ढिगारा लागला आहे.

https://twitter.com/ISCResearch/status/1235221045092720641

कोरोनामुळे हाहाकार :
चीननंतर कोरोना विषाणूचा सर्वात जास्त परिणाम इटलीवर झाला आहे. इटलीत (12,462 प्रकरणे तर 827 जणांचा मृत्यू), इराण (10,000 प्रकरणे तर 429 मृत्यू), दक्षिण कोरिया (7,869 प्रकरणे, तर 66 जणांचा मृत्यू), फ्रांस ( 2,281 प्रकरणे तर 48 मृत्यू) झाला आहे. क्युबा आणि जमैका मध्येही कोरोना व्हायरची प्रकरणे समोर आली आहेत.