IRCTC-Bus Online Ticket Booking | रेल्वेच्या वेबसाईटवर आता एसटी बसचे रिझर्वेशन, राज्य सरकारचा करार

मुंबई : IRCTC-Bus Online Ticket Booking | आता प्रवाशांना रेल्वेच्या वेबसाईटवर सुद्धा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे रिझर्वेशन करता येणार आहे. एसटीची ऑनलाईन बुकिंग सेवा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार झाल्याची माहिती आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने दिली आहे. (IRCTC-Bus Online Ticket Booking)

प्रवाशी https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर आगामी काळात एसटी बसचे तिकीट बुकिंग करू शकतात.

IRCTC च्या ऑनलाइन तिकीट पोर्टलवरून रेल्वेचे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी सध्या रेल्वे प्रवासासाठी तिकिटे बूक करत आहेत. याचा वेबसाईटवर एसटी बस बूकिंग सुविधा मिळणार आहे.

रेल्वे आणि एसटी बसच्या प्रवाशांना तिकिट बुकिंगची व्यवस्था एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने मिळणार आहे. याबाबत आयआरसीटीसीच्या सीएमडी सीमा कुमार यांनी सांगितले की, एकत्रीकरणामुळे प्रवाशांना सुरळीत प्रवासाची खात्री मिळेल.

ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयआरसीटीसीच्या सीएमडी आणि परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्यात सामंजस्य करार झाला होता.

सीमा कुमार यांनी म्हटले की, IRCTC च्या वापरकर्त्यांसाठी प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर करण्यासाठी
आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. या सामंजस्य करारामुळे रेल्वे, बस, हवाई, जल वाहतूक यासोबत निवास
व्यवस्थेसारख्या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात यश येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना

Pune PMC License Inspector Suspended | कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील
3 परवाना निरीक्षक निलंबित, नदीपात्रातील होर्डिंग प्रकरण भोवलं