ट्रेनमध्ये ‘एवढ्या’ रूपयांनी महाग होणार ‘ब्रेकफास्ट’, ‘लंच’ आणि ‘डिनर’, IRCTC ला रेल्वे मंत्रायाकडून मिळाली ‘दर’ वाढवण्याची ‘मंजूरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने प्रवास करणे आता महाग होणार आहे कारण आता रेल्वे स्टेशनवर चहा, नाष्टा आणि जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. IRCTC कडून स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई आणि एनएससीला दिलेल्या माहितीनुसार रेल्वे बोर्डानंतर आता रेल्वे मंत्रालयाने राजधानी शताब्दी आणि दुरंतो मध्ये चहा, नाश्टा आणि जेवणाचे दरवाढ करण्याला मंजुरी दिली आहे. नवीन दर इतर रेल्वेमध्ये देखील लागू केले जाणार आहेत.

शाकाहारी नाष्ट्यासाठी आता 35 रुपये आणि मांसाहारी नाष्ट्यासाठी आता 45 रुपये खर्च करावे लागणार आहेत. शाकाहारी जेवण 70 रुपये तर अंडाकार जेवण देखील 70 रुपयांनाच मिळणार आहे. तर पूर्ण मांसाहारी जेवण 120 रुपयांमध्ये मिळणार आहे.

नवीन दर यादी
सकाळचा चहा
फर्स्ट क्लास AC आणि एग्जीक्यूटिव चेयर कार : 35 रुपये
सेकेंड क्लास AC/3rd AC/चेयर कार : 20 रुपये
दुरंतो स्लीपर ट्रेन मध्ये : 15 रुपये

(2) नाष्टा
फर्स्ट क्लास AC आणि एग्जीक्यूटिव चेयर कार : 140 रुपये
सेकेंड क्लास AC/3rd AC/चेयर कार: 105 रुपये
दुरंतो स्लीपर ट्रेन मध्ये : 65 रुपये

(3) दुपारचे आणि रात्रीचे जेवन
फर्स्ट क्लास AC आणि एग्जीक्यूटिव चेयर कार: 245 रुपये
सेकेंड क्लास AC/3rd AC/चेयर कार: 185 रुपये
दुरंतो स्लीपर ट्रेन मध्ये : 120 रुपये

(4) सायंकाळचा चहा
फर्स्ट क्लास AC आणि एग्जीक्यूटिव चेयर कार: 140 रुपये
सेकेंड क्लास AC/3rd AC/चेयर कार: 90 रुपये
दुरंतो स्लीपर ट्रेन मध्ये : 50 रुपये

(5) भारतीय रेल्वेने चिकन करीबाबतचा एक नवीन पर्याय देखील देण्यात आलेला आहे.

(6) मेल/एक्सप्रेस रेल्वेत जेवणाची नवीन यादी

आयआरसीटीसी आणि जोनल रेल्वे यावर लक्ष ठेवणार आहे की, जेवणाच्या गुणवत्तेत देखील वाढ केली जाईल. या बाबतची तपासणी देखील वारंवार केली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/