यात्रीगण ध्यान दें ! स्वतः रेल्वे तिकीट ‘रद्द’ केल्यास कमी मिळतील पैसे, ‘फुल रिफंड’ घेण्यासाठी ‘ही’ पध्दत वापरा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने लोकांना सांगितले आहे की, रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांसाठी ऑनलाईन बुक केलेली तिकिटे रद्द करू नयेत, तसेच आश्वासन देखील दिले की त्यांना संपूर्ण पैसे दिले जातील. यापूर्वी रेल्वेने काउंटरची तिकिटे रद्द करण्यासाठी २१ जूनपर्यंत मुदत तीन महिन्यांनी वाढविली होती.

आयआरसीटीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रेल्वे प्रवासी गाड्या बंद झाल्यानंतर ई-तिकीट रद्द करण्यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. यात प्रवाशांच्या वतीने रद्द करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कारण प्रवाशाने तिकिट रद्द केल्यास त्याला कमी पैसे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांचे ई-तिकीट रद्द न करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ई-तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांनी वापरलेल्या खात्यात पैसे पाठविले जातील. रेल्वे रद्द झाल्यास रेल्वेकडून कोणतीही फी कपात केली जात नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे रेल्वेने ३१ मार्चपर्यंत गाड्या रद्द केल्या आहेत.

कोरोना विषाणूमुळे भारतीय रेल्वेने २२ मार्च मध्यरात्री पासून ३१ मार्च पर्यंत सर्व गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी केवळ मालगाड्या धावतील. रेल्वेने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत फक्त मालगाड्या धावतील.