३० हजार रुपयांची लाच स्विकारताना कालवा प्रकल्प अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – अनुदानाचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्विकारताना नाशिक लघु पाटबंधारे विभागाच्या पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकाऱ्याला (उप अभियंता) अ‍ॅंन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सिंचन भवन कार्य़ालयात करण्यात आली. राजेंद्र माधवराव शिरवाडकर असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप अभियंत्याचे नाव आहे.

तक्रारदार यांची वडाळी भोई येथे शेतजमीन असून त्यापैकी ६४ आर क्षेत्र पुणेगाव कालवा प्रकल्पात गेले आहे. या जमिनीची भरपाई म्हणून तक्रारदार यांना शासनाकडून ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी राजेंद्र शिरवाडकर याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी ६ जुलै रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून पथकाने ९ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज (बुधवार) सिंचन भवन कार्य़ालयात लाचेची रक्कम स्विकारताना शिरवाडकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 

Loading...
You might also like