‘आरआरटीएस’ ट्रेनचा फर्स्ट लुक जारी, 180 किलोमीटर प्रति तास वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) ट्रेनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. भारतात ती 180 किमी प्रति तास वेगाने धावणारी पहिली ट्रेन असेल. तसेच या पूर्ण ट्रेनची निर्मिती ’मेक इन इंडिया’ अंतर्गत करण्यात येत आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम ट्रेनचा फर्स्ट लुक जारी केला आहे.

मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सांगितले की, इन्फ्रास्ट्रक्चर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या पाच स्तंभापैकी एक आहे. ही खुप गर्वाची गोष्ट आहे की, आरआरटीएससाठी उच्च वेग, उच्च रूपांतर असलेली ट्रेन पूर्णपणे सरकारच्या ’मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केली जात आहे.

सचिव म्हणाले, स्टेनलेस स्टीलने तयार केलेली ही पर्यावरण अनुकूल ट्रेन आर्थिक विकासात तेजी आणेल, शिवाय आर्थिक संधी निर्माण करेल. तसेच वायु प्रदूषण, गर्दी आणि अपघात कमी करून एनसीआर जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करेल. तिचा वेग 180 किलोमीटर प्रति तास असेल.

त्यांनी सांगितले की, ट्रेन हलकी आणि पूर्णपणे वातानुकूलित असेल. प्रत्येक ठिकाणी स्वयंचलित प्लग-इन प्रकारचे रूंद दरवाजे असतील. याशिवाय ओव्हरहेड सामान रॅक, मोबाइल/लॅपटॉप चार्जिंग सॉकेट आणि अन्य कंप्यूटर-केंद्रित सुविधांसह ऑनबोर्ड वाय-फाय सुविधा असेल.

गुजरातमध्ये निर्मिती
2022 पर्यंत या ट्रेनचा पहिल्या प्रोटोटाईपची निर्मिती होईल. तसेच चाचणीनंतर ती सार्वजनिक वापरासाठी आणली जाईल. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरिडोरचे पूर्ण रोलिंग स्टॉक गुजरातच्या बॉम्बार्डियरच्या सावली प्लँटमध्ये तयार केले जाईल.