Breasfeeding करणार्‍या आईने खावे अंडे, होतील ‘हे’ 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर काय खावे आणि काय खाऊ नये, याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यातही बाळांतपणानंतरच्या खाण्याबाबत खुपच काळजी घेतली जाते. कारण बाळ अंगावरचे दुध पित असल्याने आई आणि बाळ या दोघांचा विचार करून आहार घ्यावा लागतो. बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी स्तनपान करणार्‍या मातेने कोणता आहार घ्यावा, हे खुप महत्वाचे ठरते. स्तनदा मातेने आपल्या आहारात अंडे नियमित खाल्ल्यास ते फायदेशीर ठरते. अंडे खाल्ल्याने आई आणि बाळाला कोणते फायदे होतात आणि अंड्यामध्ये कोणते घटक असतात, याविषयी आपण जाणून घेवूयात.

अंडे महत्वाचे का ?
1 अंडे हा प्रोटिनचा स्रोत आहे.
2 यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे.
3 कॅल्शिअम, फॉस्फरस सेलेनियम, झिंक असे मिनरल्स आहेत.
4 ल्युटेन, झेक्सानथिन यासारखे बायोअ‍ॅक्टिव्ह घटक असतात.

आई आणि बाळाला होतात हे फायदे
1 यातील अमिनो अ‍ॅसिडमुळे महिलांना पुन्हा ताकद मिळते. बाळाच्या स्नायूंचा विकास होतो.
2 यातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे तसेच कोलाइन, फोलेट आणि फॉस्फरस, झिंक यासारखे मिनरल्समुळे बाळाच्या मेंदूचा योग्य विकास जलद होते.
3 यातील पोषक घटकांमुळे महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
4 यातील कॅल्शिअम आणि फॉस्फरसमुळे महिलांची हाडे मजबूत होतात. बाळाच्या हाडांचा विकास होतो.

हे लक्षात ठेवा
बाळाला एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी झाली असल्यास उलटी, पोटात दुखणे, बाळाच्या मलातून रक्त, रॅश आणि सूज, अगदी दुर्मिळ प्रकरणात श्वास घेण्यात त्रास आणि तोंडाला सूज, अशी लक्षणे दिसू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. एखाद्या बाळाला अंड्याची अ‍ॅलर्जी असू शकते. जर बाळाला अंड्याची अ‍ॅलर्जी होत नसेल तर आई बिनधास्त अंडे खाऊ शकते.

अंडे खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
1 अंडे खरेदी करताना ते तुटलेले नाही, याची खात्री करा.
2 अंडे घेतल्यानंतर दोन तासांच्या आत ते फ्रिजमध्ये वेगळ्या डब्यात ठेवा, उघडे ठेवू नका.
3 कच्चे किंवा हाफ फ्राय अंडे खाऊ नका.
4 उकडलेली अंडी खा. फ्राय करून खात असाल तर चांगल्या तेलाचा वापर करा.
5 शिजवून फ्रिजमध्ये ठेवलेले अंडे खाऊ नका.