नीना गुप्ताची लेक ‘मसाबा’ अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या Ex पतीच्या ‘प्रेमात’ ! दोघही गोव्यात ‘लॉकडाऊन’

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. मसाबा सध्या आपल्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या मसाबा गोव्यात आहे. खास बात अशी की, मसाबा गोव्यात एकटी नाही तर अ‍ॅक्ट्रेस अदिती राव हैदरीचा एक्स हसबंड सत्यदीप मिश्रा हादेखील तिच्या सोबत आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, मसाबा मार्चमध्ये सत्यदीप मिश्रासोबत मुंबईहून गोव्याला गेली आहे. अशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळं मसाबा मुंबईला परत येऊ शकली नाही. मार्चपासूनच ती गोव्यातच आहे. मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या डेटींगच्या बातम्यांनी सध्या जोर धरला आहे. रिपोर्टनुसार मसाबा सत्यदीपच्या गोव्यातील घरी त्याच्यासोबत आहे. इंस्टा पोस्टवरून असं लक्षात येत आहे की, सत्यदीपचं गोव्यात घर आहे. मसाबा घटस्फोटानंतर एकटीच दिसत होती. परंतु सध्या मात्र ती सत्यदीप सोबत दिसत आहे.

2009 मध्ये विवाहबद्ध झाले होते अदिती राव आणि सत्यदीप मिश्रा

अदिती राव आणि सत्यदीप मिश्रा 2009 मध्ये विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2013 मध्ये काही कारणांमुळं दोघांनी घटस्फोट घेतला होता.