Vodafone-Idea काय बंद होणार ? जाणून घ्या वास्तव अन्यथा होईल मोठं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही व्होडाफोन आयडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होण्याची शंका उपस्थित केली जात आहे. तसेच शक्यता वर्तवली जात आहे की सामान्य कॉल, इंटरनेट डाटासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. AGR म्हणजेच अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेवेन्ह्यूखाली दबल्या गेलेली या कंपनीची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. बुधवारी देखील कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. त्यामुळे शक्यता आहे की कंपनी भारतातील आपला व्यवसाय गुंडाळू शकते. कंपनीला एजीआरचे 53,000 कोटी रुपये फेडायचे आहेत. परंतु त्यासाठी कंपनी असमर्थ आहे.

कंपनी आपले अस्तित्व टिकावण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीला 53,000 कोटी रुपये फेडायचे आहेत. परंतु कंपनीकडून सांगण्यात आले की त्यांच्याकडे सरकारचे पैसे फेडण्यासाठी पैसेच नाहीत. जाणकारांच्या मते कंपनीने आपल्या व्यवसाय गुंडाळण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही दिलासा –
प्रकरणाच्या जाणकारांच्या मते बुधवारी न्यायालयाने सांगितले की कंपन्यांना आपली एजीआर शुल्क देण्यात कोणताही दिलासा दिला जाणार नाही. सरकारने कंपन्यांकडून 20 वर्षांपर्यंत पैसे वसुल करण्याचा एक प्लॅन तयार केला आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली. विशेषज्ञांच्या मते न्यायालय शुल्क फेडण्यासाठी दिलासा देण्याच्या विचारात दिसत नाही.

मोबाइल टॅरिफमध्ये होऊ शकते वाढ –
डिसेंबर महिन्यात टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका लागला. त्यामुळे कंपन्यांनी टॅरिफ तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढ केली. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या दरम्यान कंपन्या पुन्हा मोबाइल टॅरिफमध्ये वाढ करु शकतात.