सुसाईड नोट बरोबरच मरणाऱ्याची मानसिक स्थिती लक्षात घेणे गरजेचे : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

व्यक्तीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्यास, त्या नोट वरून त्याच्या मृत्यूचा निकष काढल्या जातो, आता मात्र त्याच्या मानसिक स्थिती लक्षात घेत त्याने आत्महत्या का केली या सर्व गोष्टींच्या बाबी लक्षात घेण्यात यावी असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

आत्महत्या करण्यास अनेक करणे असतात, जसेकी व्यक्तिच्या मानसिकस्थिती, डिप्रेशन, सामाजिक समस्यांमुळे निर्माण झालेली भीती, बायपोलर डिसऑर्डर, आर्थिक, सामाजिक जीवन अश्या अनेक गोष्टींचा समावेश असतो, असेच एखादे कारण सुसाईड नोट वर लिहून आत्महत्या केली जाते, त्या नोट वरून त्याच्या मृत्यूचा निकष लावल्या जातो, हा निकष लावणे योग्य नाही, त्यामुळे मरणाऱ्याची मानसिक स्थिती आदी पुराव्यांकडेही लक्ष दिले पाहिजे. विशेष म्हणजे सुसाईड नोटचा बारकाईने तपास केला पाहिजे. केवळ सुसाईड नोट सापडली म्हणून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढता कामा नये. असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. गाबा यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0001380c-c6da-11e8-ab46-9f1a23b73c4d’]

विशेष म्हणजे आत्महत्या करण्यामागे सुसाईड नोटमध्ये जी कारणे दिली जातात, त्यावरून पीडित व्यक्ती अन्य बाबींचा विचार करण्यासाठी कोणतीही शंका राहू देत नाही. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण काय याचा शोध लागत नाही, यामुळे सुसाईड नोटचा बारकाईने तपास झाला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

[amazon_link asins=’B06XFLY878,B0119ROQXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b339554-c6da-11e8-8ff4-8d2543d87dc7′]