‘महसुल’च्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला जाणे हा प्रकार चुकीचाच ! जिल्हाधिकार्‍यांकडे अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी : आ.अशोक पवार

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील महसुल विभागाच्या ताब्यातील वाहने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.त्यानंतर या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर मध्ये महसुल विभागाचे अधिकारी सहभागी असल्याची जोरदार चर्चा सर्वञ सुरू झाली आहे.वाळू ही महसूलला सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे आहे.त्यामुळे अधिकारी वाळू तस्करांना सांभाळताना दिसत आहेत.तर दुसरीकडे गाड्या चोरीला गेल्यानंतर तक्रार दाखल करण्यास केलेला विलंब , तर शासकीय धान्य गोदाम असलेल्या ठिकाणाहून वाहने चोरी जाणे हे देखील संशयास्पद आहे.

यामध्ये महसुल विभागाच्याच अधिकाऱ्यांने ह्या गाड्या सोडल्या असल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत. एकीकडे जोरदार कारवाई करत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे मोठे आर्थिक व्यवहार करून गाड्या सोडण्यात येत असल्याचे प्रकार देखील सुरु असल्याचे एका वाळू व्यवसायिकांने नाव न छापण्याच्या अटिवर सांगितले .

तर झालेला प्रकार हा खूप चुकीचा आहे.या मध्ये नक्कीच अधिकारी सामिल असणार आहे.या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार केली असून,अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खातेनिह चौकशी करण्याची मागणी केली आहे.असे “पोलिसनामा” शी बोलताना शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले .