‘वर्‍हाडी’ म्हणून छापा टाकण्यासाठी पोहचले अधिकारी, कारवर चिटकवलं लग्नाचं ‘स्टीकर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यात आयकर विभागाचे पथक वरात घेऊन छापा टाकण्यासाठी पोहचले. यासाठी सर्व वाहनांवर ‘आदर्श शुभविवाह संस्कृती’ असे स्टिकर लावले होते.
विभागाच्या 40 सदस्यांच्या पथकानी 2 संस्थामध्ये तपास करत कारवाई सुरु केली ज्यात लाखोंच्या स्टॉकची माहिती मिळाली.

मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यात आलेल्या वाहनावर लावण्यात आलेल्या स्टीकर कोणत्याही नवविवाहित जोडप्याचे नव्हते, तर हे वाहन आयकर विभागाचे होते ज्यात छापा टाकणारे अधिकारी होते.

हरदामध्ये अग्रवाल ऑटो पार्टस आणि राजस्थान मशीनरीवर कारवाई करण्यासाठी बुधवारी सकाळी हे पथक पोहचले होते. आयकर विभागाचे जॉइंट कमिशनर अल्पेश परमार म्हणाले की पहिल्यांदा स्टॉकमध्ये फरक दिसून आला, परंतु अंतिम माहितीसाठी वेळ लागला. ज्या संस्थामध्ये तपास सुरु होता तेथे स्टॉक जास्त प्रमाणात असल्याने वेळ लागला.