Coronavirus : इटलीमध्ये 24 तासात 889 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 92472 लोकांना कोरोनाची लागण तर 10000 रूग्णांचा बळी

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनोची धास्ती कायम असून इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वात मोठी हानी झाली आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी होणार्‍यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या व्हायरसची हजारो लोकांना लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता विळखा अधिक घट्ट झाला असून आतापर्यंत इटलीमध्ये 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासांत 889 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 92 हजार 472 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

इटलीमध्ये 21 फेब्रुवारीनंतर देशाच्या उत्तरेकडील भागात कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. आतापर्यंत इथे 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद कऱण्यात आली आहे. चीननंतर सर्वात जास्त धोका इटलीमध्ये असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या महासंकटात इटलीतील 589 लोकांनी यशस्वीरित्या मात केली आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 400 नव्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजारहून अधिक लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. महासंकटावर मात करण्यासाठी जगभरात अनेक शास्त्रज्ञ लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. चीननंतर इटलीत सर्वात जास्त धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.