ITBP नं प्रथमच केला मोठा खुलासा, सांगितलं – ’15 आणि 16 च्या रात्री गलवान खोर्‍यात काय झालं होतं’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत तिबेट सीमा पोलिसांनी प्रथमच सांगितले की, पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात 15-16 जूनच्या रात्री काय घडले होते. आयटीबीपीने सांगितले, पूर्ण रात्र चीनी सैनिकांना आपल्या सैनिकांनी नाकी नऊ आणले होते. आयटीबीपीने या संघर्षात सहभागी झालेल्या आपल्या 21 जवानांना शौर्य पदक देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली.

आयटीबीपीने म्हटले, पूर्ण रात्र जवानांनी चीनी सैनिकांना कठिण परिस्थितीत सुद्धा तोडीसतोड प्रत्युत्तर दिले आणि त्यांना मागे पळून जाण्यास भाग पाडले. या दुर्दम्य धाडसासाठी आयटीबीपीने शुक्रवारी 294 जवानांना महासंचालक पदकाने सन्मानित केले.

आयटीबीपीने सांगितले, जवानांनी गलवान खोर्‍यात अतिदुर्गम भागात आपल्या सैनिकांचा बचाव केला आणि शत्रूला तोडीसतोड उत्तर दिले. त्यांच्या धाडसामुळे चीनी सैनिकांना पळावे लागले आणि स्थिती नियंत्रणात आली. आपल्या धाडसी जवानांच्या युद्ध क्षमतेमुळे आपण चीनी सैनिकांना आत घुसखोरी करण्यापासून रोखू शकलो आणि सर्व अति संवेदनशील चौक्यांचे संरक्षण करू शकलो.

जवानांनी लागोपाठ 17-22 तासपर्यंत मोर्चा सांभाळला. घणाघाती पलटवारामुळे कमी नुकसान झाले. आपल्या जवानांनी बर्फाच्या पाण्यातून सहकारी जवानांचे मृतदेह परत आणले. 20 आयटीबीपी जवान या संघर्षात शहीद झाले. चीनचे सुद्धा मोठ्या संख्येने जवान या संघर्षात शहीद झाले.