‘मला माफ कर आई – ‘कोरोना’पासून लोकांचा जीव वाचवायचा आहे, म्हणून तुझ्या चितेला ‘मुखाग्नि’ नाही देऊ शकत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूला पळवून लावायचे आहे, म्हणून कोरोना योद्धा दिवसरात्र लढाई लढत आहेत. असाच एक ‘योद्धा’ त्याच्या आईला आगदेखील देऊ शकला नाही आणि कोरोना पीडित व्यक्तींवर उपचार करण्यात मग्न राहिला. होय ! जयपुर येथील एसएमएस हॉस्पिटल येथे कोविड -19 साठी बनविण्यात आलेल्या आयसोलेशन आणि आयसीयूचे नर्सिंग प्रभारी राममूर्ती मीणा यांच्याबद्दल आपण बोलत आहोत.

वास्तविक, कोरोना पासून लोकांना वाचविण्याच्या प्रयत्नात राममूर्ती मीणा यांच्या 93 वर्षीय आई भोली देवी यांचे निधन झाले. पण राममूर्ती मीणा यांनी आपले कर्तव्य सोडले नाही. मीणा यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आईचे शेवटचे दर्शन घेतले आणि त्यांच्या भाऊने आईची शेवटची विधी पार पाडली. जन्म देणाऱ्या आईवर मातृभूमीचे प्रेम भारी पडले. राममूर्ती मीणा यांनी कोरोनाला सामोरे जाणाऱ्यांना एकटे सोडले नाही आणि इतका मोठा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे साथीदारही भावूक झाले. रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांनीही मीणा यांना सलाम ठोकला.

रुग्णांची करत होते सेवा

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा राममूर्ती मीणा यांना आईच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा ते रुग्णांची सेवा करत होते. असे असूनही, ते आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाही. दुसरीकडे, आईच्या निधनाच्या दु:खात येणारे अश्रू थांबवून व्हिडिओ कॉलवर अंतिम संस्कारात भाग घेतला. आपल्या आईची दिलगिरी व्यक्त करीत ते म्हणाले, ‘आई, मला माफ कर, मी तुझ्या चितेस अग्नी नाही देऊ शकलो.’ राममूर्ती मीणा मूळचे करौलीतील राणोली गावचे रहिवासी आहेत. कोरोनाच्या रुग्णांना ज्या वार्डात आयसोलेशन मध्ये ठेवले जात आहे, तिथे मीणा सर्व जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत.