महापौरांचे पती आणि आरएसएस प्रचारक 20 कोटींचं कमिशन मागताना कॅमेर्‍यात कैद, व्हायरल सीडीमुळं प्रचंड खळबळ

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकनंतर (Karnataka) आता राजस्थानमध्ये (Rajasthan) सीडी प्रकरणामुळे (CD case) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सीडीत कचरा साफसफाई करणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींशी जयपूर ग्रेटर कॉर्पोरेशनच्या (Jaipur Greater Corporation) निलंबित महापौर सौम्य गुर्जर (Suspended Mayor Soumya Gurjar) यांचे पती राजाराम गुर्जर (Rajaram Gurjar) हे बिल मंजूर करण्याच्या बदल्यात पैशांच्या व्यवहाराबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सीडीमध्ये राजस्थानमध्ये संघ प्रचारकाच्या भूमिकेत काम करणारे निंबा रामदेखील (Nimba Ram) दिसत आहेत. हि सीडी व्हायरल (CD viral) होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) केस दाखल केली आहे. हि सीडी कोणी व्हायरल केली आणि ती कुठून आली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) ज्या तत्परतेने हे प्रकरण हाताळत आहे त्यावरून याची तयारी आधीपासूनच सुरू होती असे दिसत आहे.

या कंपनीला कचरा गोळा करण्याचे कंत्राट वसुंधरा राजे (Contract Vasundhara Raje) यांच्या कार्यकाळात देण्यात आले होते.
निलंबित सौम्य गुर्जर (Soumya Gurjar) आणि भाजपच्या (BJP) तीन कार्यकर्त्यांनी याच्याच बिलांच्या देयकासाठी पालिका आयुक्तांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर जयपूर ग्रेटर कॉर्पोरेशनच्या महापौर सौम्या गुर्जर आणि भाजपचे तीन नगरसेवक (Corporator) पारस जैन, अजय चौहान आणि शंकर शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते.
या व्हायरल सीडीसंदर्भात बोलताना राजाराम गुर्जर म्हणाले की.
हि सीडी बनवत असून आम्ही कोणत्याही व्यवहाराबद्दल बोललो नाही.
भाजप नेत्यांसह संघाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मात्र, जे सत्य आहे ते समोर येईल असे परिवहन मंत्री प्रताप खाचरियावास (Transport Minister Pratap Khachariawas) म्हणाले.

सीडी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतःच गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
याबाबत बोलताना डीजी बीएल सोनी (DG BL Sony) म्हणाले.
गुन्हा दाखल करून तपासालाही सुरुवात करण्यात आली आहे.
सौम्या गुर्जर (Soumya Gurjar) यांच्या निलंबन प्रकरणाची सुनावणी आज राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) होणार आहे.
यापूर्वीच राजस्थान सरकारने कॅव्हेट दाखल केले होते.

महंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’

Video : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Coronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही

Wab Title :- jaipur mayor somya gurjars husband and RSS campaigner demanding Rs 20 crore commission, viral CD