#Surgicalstrike 2: ‘या’ कारणासाठी एअरस्ट्राईकसाठी बालाकोटची निवड

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था- पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी या भागात ही कारवाई करण्यात आली.

#Surgicalstrike2 : पाकला चकवण्यासाठी भारतीय विमानांचे २० हवाई तळांवरून उड्डाणे

देशाच्या वेगवेगळया भागत आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी बालकोटमधील जैशच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यासाठी आत्मघातकी हल्लेखोरांना तयार करण्यात येत होते. याबाबतची गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे ही कारवाई आवश्यक होती. या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

#Surgicalstrike2 :Air Strike मध्ये अझर मसूदचा मेव्हणा ठार ?

म्हणून एअर स्ट्राइकसाठी बालाकोटची निवड –
बालाकोटपासून ४० किलोमीटर दूर पाकिस्तान अधिकृत काश्मीरच्या मुजफ्फराबाद मध्येही जैश ए मोहम्मदचे अनेक कॅम्प आहेत. त्यामुळेच बालाकोट हा भाग दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. तालिबान’च्या खात्म्यानंतर ‘जैश ए मोहम्मद’नं आपला कॅम्प बालाकोटमध्ये हलवला होता. २००० – २००१ साली बालाकोटमध्ये जैशनं आपले दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बनवले होते. ‘अल रहमान ट्रस्ट’ नावानं जैश ए मोहम्मदचीच आणखी एक संघटना या भागात दहशतवादी कारवायांत सहभागी आहे. बालाकोटपासून अडीचशे किलोमीटर दूर अंतरावर पेशावरमध्येही जैश ए मोहम्मदचे अनेक कॅम्प आहेत. म्हणून याच भागावर एअरस्ट्राईक करण्याचा निर्णय भारतीय वायुदलानं घेतला.

#Surgicalstrike2 : ‘मांग रहा है हिंदुस्तान खतम कर दो पाकिस्तान’

जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मैलाना युसूफ अझहर हा कॅम्प चालवत होता. जैशच्या तळांवरच हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्यावेळी सर्वसामान्यांना झळ बसणार नाही, याची काळजी घेण्यात आली.