दुचाकीच्या पार्किंगवरून महाविद्यालयात विद्यार्थ्याचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकी पार्किंग करण्याच्या शुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. ही घटना शहरातील एम.जे. महाविद्यालयात आज (शनिवार) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. मुकेश सपकाळे (रा. आसोदा) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मुकेश हा कबड्डी प्लेअर असून त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मयत मुकेशचा मोठा भाऊ रोहित सपकाळे याचा सेतुसुविधा केंद्र आहे. मुकेश आज दुपारी आपल्या मोठ्या भावाच्या कॉलेजमध्ये काही मुलांच्या अॅडमिशनचे कागदपत्र देण्यासाठी आला होता. त्याने त्याची दुचाकी पार्किंगमध्ये लावली होती. भावाला कागदपत्र दिल्यानंतर तो परत जाण्यासाठी पार्किंगमध्ये आला. त्यावेळी दुचाकी काढण्यावरून त्याचा एका तरुणाशी वाद झाला. यातूनच दोघांमध्ये धक्काबुक्की करण्यात आली.
मुकेशने मारहाण करणाऱ्यांना आपला भाऊ याच कॉलेजमध्ये आहे. मला मारु नका अशी विनंती केली. त्याने आपल्या भावाला फोन करून बोलावले असता. मारहाण करणाऱ्यापैकी एकाने चाकुने सपासप वार केले.

घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी कॉलेजमध्ये भेट देऊन संशयितांचा शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतरांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मराठा आरक्षण झाले आता धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय : सुनिता गडा

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

You might also like