जालन्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची बाजी

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचा बालेकिल्ला आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे होमपीच जालना मतदारसंघात दानवेंनी अखेर विजय मिळविला. तर कॉंंग्रेसचे विलास औताडे हे पराभूत झाले. या मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि कॉंग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात चुरस होती.

जालना मतदारसंघातून सलग पाचव्यांदा भाजपने विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्यांच्याविरोधात काॅंग्रेस कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली होती. कॉंग्रेसच्या महाराष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे यांना उमेदवारी दिली. २०१४ च्या निवडणूकीत रावसाहेब दानवेंनी विलास औताडे यांचा २ लाख ६ हजार ७९८ मतांनी पराभव केला होता. तर भाजपाला दानवे आणि खोतकर यांच्या वादाचाही फटका बसण्याची शक्यता होती. त्यानंतर रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर खोतकर पुन्हा आक्रमक झाले होते. त्यांची शिवसेना, भाजपमधील श्रेष्ठींनी समजूत घातली. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. परंतु जालना मतदारसंघात या भाजप शिवसेनेच्या या अंतर्गत वादामुळेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

विजयी उमेदवार – रावसाहेब दानवे –

पराभूत – विलास औताडे –

एकूण उमेदवार – २०

५ वाजून ५५ मिनिटापर्यंतची आकडेवारी

रावसाहेब दानवे (भाजप) – ६३०५०३

विलास औताडे (क़ॉंग्रेस) – ३२६४९०

जालन्यातील एकूण मतदार – १८ लाख ६५ हजार ०४६

पुरुष मतदार – ९ लाख ८८ हजार ५१३

महिला मतदार – ८ लाख ७६ हजार ५२३

जालन्यात झालेले मतदान – १२ लाख ०३ हजार ९५८