1,50,000 ची लाच घेताना अप्पर तहसीलदार किशोर देशमुख अँटी करप्शन जाळयात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद येथे कार्यरत असणारे अप्पर तहसीलदार यांना दीड लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. किशोर देशमुख असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रॉयल्टी पावतीच्या सत्यापणासाठी तब्बल ३ लाख २० हजार आणि वाळू वाहतुकीसाठी प्रति महिना दीड लाखाची मागणी होती.

याबाबत अधिक माहिती अशी, वाळू वाहतूकदाराचे २ हायवा एमआयडीसी पोलिसांनी पकडले होते. सदर हायवाच्या रॉयल्टी पावतीच्या सत्यापन करण्यासाठी ३ लाख २० हजार रुपये आणि वाळू वाहतूक करून देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांनी केली होती. यावेळी ही लाच घेताना अप्पर तहसीलदारांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच दीड लाख रुपये लाच मागितल्यामुळे वाहतूकदार गोंधळाला होता. त्यामुळे तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तर वाहतूकदारांनी शेंदूरवाडा येथील खाम नदीतील वाळू उपासाचे अधिकृत टेंडर घेतले आहे.

दरम्यान, या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अप्पर तहसीलदार याला अटक केली आहे. आरोपी किशोर देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.