जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान ; मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाच्या जवानांची पहाटेपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानानां यशे आले आहे. तर ४ भारतीय जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

बडगाममधील सुत्सू गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी परिसराला घेराव घातला. त्यानंतर शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये शुक्रवारी चकमक सुरु झाली.

या चकमकीत जैश-ए- मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी शोपीयां जिल्ह्यातील केलर भागात झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Loading...
You might also like