जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबारात भारताचा जवान शहीद

पोलिसनामा ऑनलाईन – पाकिस्तानच्या सुरू असणार्‍या कुडघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. गोळीबारला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.

राजौरी भागातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूच आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रमाणही वाढत आहे. घुसखोरांविरोधात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. एकीकडे घुसखोरांविरुद्धची कारवाई आणि कोरोनाचे आव्हान असतानाच आता पाकिस्तानने सीमेपलिकडून गोळीबार सुरू केला. कोरोना व्हायरस, भारत चीन संघर्ष, सीमेपलिकडून होणारे शस्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला होणारे नुकसान. या सगळ्याच आव्हानांन भारता एकाच वेळी समोर जात आहे. जवान बदलते हवामान आणि कोरोनासोबत वारंवार होणार्‍या पाकड्यांकडून होणार्‍या नापाक कारवायांनाही चोख उत्तर देत आहेत.