जम्मू-काश्मीरच्या बिजबेहरामध्ये ‘एन्काउंटर’, लष्करच्या जवानांनी केला 2 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

श्रीनगर : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीर येथील बिजबेहरामध्ये शुक्रवारी आणि शनिवारच्या दरम्यान रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.

शुक्रवारी रात्री, बिजबेहरा येथील संगममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून सांगितले आहे की, पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराद्वारे करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

You might also like