काय सांगता ! होय, विद्युत विभागानं ‘या’ व्यक्तीला पाठवलं तब्बल 10 कोटी रुपयांचं वीज ‘बिल’, बसला मोठा धक्का

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील सीमावर्ती गावात राहणाऱ्या एका व्यक्तीला तेव्हा जोराचा धक्का बसला, जेव्हा वीज विभागाने त्याला 10 कोटी रुपयांचे वीज बिल पाठवले. बिल पाहताच त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले.

तथापि, जम्मू-काश्मीरमधील लोकांना अनेक पटीने जास्त बिल भरण्यासाठी वीज विभागाने वीज बिल पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. पुंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील गुहरियन शेइकलियन गावात राहणारे फिरोज दिन यांचा मुलगा मोहम्मद हनीफ याच्या घरी ‘अवघ्या 10,08,38,138 रुपयांचे वीज बिल आले.

चुकीचे वीज बिल मिळाल्यामुळे तरुणाने गावच्या सरपंचाशी भेट घेतली असून वीज बिलात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. पुंछचे जिल्हा आयुक्त राहुल यादव म्हणाले, ‘कर्मचारी पातळीवरची ही चूक होती, ती सुधारली जाईल. संपूर्ण माहिती तर वीज विभागच देईल, परंतु हो ही एक संगणकीय चूक आहे.’ ते म्हणाले की असे होऊ शकते की मीटर रीडिंग दोनदा घेतले गेले असेल. त्याचबरोबर दहा कोटी रुपयांचे हे वीज बिल पीडीडी सब डिव्हिजन मेंढरच्या एईई कार्यालयातून पाठविण्यात आले होते.