‘विस्फोटक’ IED नं भरलेली गाडी, बाईकची नंबर प्लेन, पुलवामा पार्ट-2 चा कट ‘असा’ ठरला अपयशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यात एका वाहनात आयईडी लावण्यात आला होता. सुरक्षा दलाने त्याचा मागोवा घेतला आणि वेळीच त्यास डिफ्यूज केले. मिळालेल्या माहितीनुसार वाहनात मोठ्या प्रमाणात आयईडी होते, आता ते डिफ्यूज करण्यात आले आहे. अर्थात एक मोठा हल्ला होण्यापासून रोखण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांपासून या संदर्भात इनपुट मिळत होता. सॅंट्रो कार काही नाक्यांवर थांबत नव्हती, त्यानंतर संशय अधिक तीव्र झाला. याशिवाय आयईडीचे इनपुटही प्राप्त झाले, त्यानंतर दक्षता पूर्णपणे वाढविण्यात आली. आता एनआयए या प्रकरणाची चौकशी करेल, लवकरच एनआयएची एक टीम या भागाला भेट देईल.

दरम्यान, ज्या वाहनात आयईडी सापडला ती पांढरी रंगाची सॅन्ट्रो कार होती. कठुआ येथून सापडलेल्या या वाहनावर दुचाकी नंबर प्लेट बसविण्यात आली होती. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांना चकमा देऊन हा हल्ला घडविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात होते. जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि अन्य सुरक्षा दलांनी एकाच वेळी ही कारवाई केली.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा रोडजवळ हे वाहन पकडले गेले. खेड्याजवळील भागात गाडी थांबविण्यात आली, त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल पथकाला बोलविण्यात आले. या दरम्यान कार, घरे आसपासची जागा रिकामी करण्यात आली. जेव्हा आयईडी डिफ्यूज झाला तेव्हा छोटासा स्फोट झाला. यावेळी, केवळ वाहनांचे नुकसान झाले, कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.