Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘संजय राऊतांमुळे शिवसेना खड्डयात, ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार (व्हिडीओ)

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – Jan Ashirwad Yatra | संजय राऊतांना (Sanjay Raut) शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त शिवसेनेनं बोलायला ठेवले आहे. पण त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना (Shivsena) खड्ड्यात जात आहे. माझ्या मुलाची बरोबरी करु नका. नाहीतर मलाही ‘सामना’तल्या लिखाणावर ‘प्रहार’मधून प्रत्युत्तर द्यावं लागले, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना दिला आहे. नारायण राणे कणकवलीत जन आशीर्वाद यात्रा निमित्त (jan ashirwad yatra) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून संजय राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश (Nilesh Rane) आणि नितेश (Nitesh Rane) यांच्यावर टीका केली आहे. त्याला उत्तर देताना राणे चांगलेच संतापल्याचे पहायला मिळाले. माझ्या मुलांवर टीका करण्यापूर्वी तुझ्या मालकाची मुलं काय करतात ते पहा. माझी मुलं सुशिक्षीत आणि हुशार आहेत. त्यांची तुलना करण्याची काहीच गरज नाही. टीका करणं थांबवा नाहीतर मलाही ‘प्रहार’मधून (Prahar) उत्तर द्यायला सुरुवात करावी लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

संदुक उघडायला कुणी थांबवलं ?

तुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान राऊत यांनी केले होते. राऊत यांच्या विधानाला उत्तर देताना राणे म्हणाले, एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला ? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना समानाचा (Samana) संपादक, ना धड प्रवक्ता, त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.

 

 

जन आशीर्वाद यात्रेत ‘मांजर’ आडवी गेली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आदेशाचे पालन करत आम्ही जन
आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी लोक
सहा-सात तास उभं राहून यात्रेला प्रतिसाद देत आहेत. पण यात्रेत काही अपशकून देखील झाले.
मांजर आडवी गेली. पण मी काही त्याला फारसं महत्व देत नाही. यात्रा आजही मोठ्या उत्साहात
आणि प्रचंड प्रतिसादात सुरु असल्याचे राणे यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

Video Viral | ‘विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचं डोकं फोडून टाका’, लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणार्‍या उप न्यायदंडाधिकार्‍यांचा व्हिडीओ व्हायरल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Jan Ashirwad Yatra | shiv sena party not increasing due sanjay raut says narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update