Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Fitness) ने तिच्या फिटनेसचे रहस्य चाहत्यांसोबत शेअर केले आहे. जान्हवी कपूरने तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाची सुरुवात निरोगी पद्धतीने करण्यास प्रोत्साहित केले आहे. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आणि शेपमध्ये येण्यासाठी ती साध्या आणि सोप्या फिटनेस टिप्स शेअर करते (Janhvi Kapoor Reveals Her Fitness Secrets).

 

जान्हवी कपूर म्हणाली, तुम्ही जे खाता तेच असता, पंजाबी कुटुंबातील असल्याने मी एक गुबगुबीत मुलगी होते. गुबगुबीत होण्यापासून ते आकारात येण्यापर्यंत हे एक चॅलेंजिंग रोलर कोस्टर जीवन होते. तुमचा फिटनेस प्रवास लहान आणि साध्या जीवनशैलीतील बदलांसह सुरू करणे महत्त्वाचे आहे. हेल्दी ऑपशन्ससाठी डाएट हॅबिट. मी माझा फिटनेस छोट्या पावलांनी सुरू केला ज्यात माझ्या रोजच्या जेवणाच्या सवयीमध्ये जास्त हेल्दी फळे, भाज्या खाणे आणि जंक फूड टाळणे हे यांचा समावेश आहे. (Janhvi Kapoor Fitness)

 

जान्हवी कपूर म्हणते, मला प्रोटीन रिच ब्रेकफास्ट आवडतो, जसे की ब्राउन ब्रेड, ओट्स, अंड्याचा पांढरा भाग आणि माझे आवडते सफोला फिटीफाय पीनट बटर. मला चांगले वाटते की हे ओमेगा ३, व्हे प्रोटीन, गोड नसलेले डार्क चॉकलेट ते व्हेजिटेरियन ऑपशन्सच्या व्हेरिएंटमध्ये येते. दोन्ही एक्सट्रा क्रंची आणि सुपर मलईदार रूपात. दुपारच्या जेवणासाठी, मी फक्त घरी शिजवलेले पदार्थ खाते किंवा मी शूटसाठी बाहेर असल्यास फळे, भाज्यांचा ज्यूस घेते. मी माझे रात्रीचे जेवण खूप हलके घेते, भरपूर उकडलेल्या भाज्या, सूप आणि कधीकधी ग्रील्ड फिश.

जिममध्ये खूप घाम गाळते जान्हवी
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ला वाटते की शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
ती म्हणते, तुम्हाला आवडेल अशा कोणत्याही स्वरूपात घाम गाळणे आणि सातत्याने व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
मी वैयक्तिकरित्या कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, पायलेट्स, पोहणे, योग आणि नृत्याचासुद्धा आनंद घेते.
माझ्यासाठी योग हा रेमिडियल आहे कारण तो माझ्या मनाला आराम देतो.

 

Web Title :- Janhvi Kapoor Fitness | bollywood actress sensation janhvi kapoor reveals her fitness secrets from chubby to curvy body shape

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार