सकाळी नाष्ट्यामध्ये घ्या जापानी ‘बनाना डायट’, शरीराच्या प्रत्येक भागातील चरबी होते ‘गायब’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – नाष्टा हा दिवसातील सर्वांत महत्त्वाचा आहार आहे. कारण यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. नाष्ट्याला खाल्लेल्या गोष्टी आपल्याला दिवसभर ऊर्जावान ठेवतात. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल, तर नाष्ट्यामध्ये योग्य पदार्थ खाणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण जर मेटाबॉलिज्म योग्य नसेल तर वजन कमी करण्यात समस्या उद्भवेल. जपानी केळी ही आपले वजन कमी करते तसेच रोगांपासून बचाव करते.

हा आहार जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे
वजन कमी करण्यासाठी जपानी नागरिक केळी आहाराला पहिली पसंती देतात. हा आहार केवळ पौष्टिक पदार्थांनीच भरलेला असून शरीराला अनेक पोषकद्रव्येदेखील देतो.

जपानी लोक ब्रेकफास्टमध्ये केळीला आहारात महत्त्व देतात का..
१) यात फक्त गरम पाण्याबरोबर केळी खाल्ली जाते. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि पोट बर्‍याच काळापर्यंत भरलेले राहते. हे पचन सुधारण्यास आणि पोट साफ ठेवण्यासदेखील उपयुक्त आहे.

२) जर तुम्ही केळी किंवा त्यासोबत सफरचंद, डाळिंबासारखे फळ खाल्ले तर तुम्हाला अधिक फायदा होईल.
३) आपण दुपारचे जेवण, सकाळचे किंवा संध्याकाळी काहीही खाऊ शकता. केळीमध्ये फायबर, प्रथिने, कॅल्शियम असतात, जे मेटाबॉलिज्मला चालना देतात आणि दिवसभर पोट भरलेले राहते.
४) आहाराच्या नियमांनुसार रात्री ८ नंतर काहीही खाऊ नये. आपण फक्त पाणी पिऊ शकता. आपल्याला बरेच फायदे मिळतात.
५) आपण आहाराचे पालन केल्याने केवळ पोटच नाही तर शरीराच्या प्रत्येक भागाची चरबी कमी होते.
६) केळीमध्ये अनेक एंजाइम आढळतात. त्यामुळे पाचन क्रिया सुधारते आणि आपण बद्धकोष्ठता, पित्त, पोटदुखीसारख्या समस्येपासून दूर राहता.
७) सकाळी गरम पाण्याबरोबर केळी खाल्ल्याने मेटबॉलिज्म सुधारते. आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
८) केळीही पोटॅशियम समृद्ध आहे जे शरीरातील चरबी नियंत्रित करते. शरीरातील विषाणू घटक काढून टाकण्यास मदत करते.
९) त्वचा डिटोक्स करते आणि चमकवते. तसेच हे वृद्धत्वविरोधी समस्यादेखील दूर ठेवते.