Jayant Patil | जयंत पाटलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना फटकारले, म्हणाले – ‘आधी माहिती घ्या, उगाच बोलू नका’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपविरोधी (BJP) तिसऱ्या आघाडीची (Third Front) चर्चा रंगली आहे. पण, काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी आधी माहिती घ्यावी आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर कशाला बोलायचं असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टोला लगावला आहे. नाना पटोले यांच्या टीकेला आज जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उत्तर दिले.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटीनंतर टीका केली होती. काँग्रेसशिवाय आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, अशी टीका पटोले यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उत्तर देताना त्यांना फटकारले.

 

जयंत पाटील म्हणाले, मोदी सरकारविरोधात (Modi Government) समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीने वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहेत. नाना पटोले यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यावी.
राज्य पातळीवरील नेत्यांनी (State Level Leader) राष्ट्रीय राजकारणावर (National Politics) कशाला बोलावे, असा टोला लगावला.

महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे त्यामुळे टोकाची भाषा टाळली पाहिजे पण सुड उगवण्याचा प्रकार हे दिल्लीतील सरकार आल्यापासून वाढला
असल्याने प्रतिक्रिया वाढल्याने असे प्रकार घडत आहे. असे असले तरी दोन्ही बाजूने तारतम्य बाळगावे असेही
जयंत पाटील यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या वादावर भाष्य केलं.

 

Web Title :- Jayant Patil | dont talk too much about national politics ncp leader jayant patel slammed congress leader nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police Commissionerate | पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन-अत्याधुनिक पत्रकार कक्षाचे ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत, मृत्यूच्या संख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nanded Terrible Accident | दुर्देवी ! नांदेडमध्ये नववधूला घेऊन जाताना भीषण अपघात, नवरीसह 7 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता