Jayant Patil | ‘षंढांचे काय करायचे, षंढ कोणत्याच भूमिकेत नसतात’, सुजय विखेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा खरमरीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) भाजपचे खासदार सुजय विखे (BJP MP Sujay Vikhe) यांनी टीका केली होती. महाविकास आघाडीचा संसार म्हणजे, लग्न राष्ट्रवादी (NCP)-शिवसेनेचे (Shivsena), राष्ट्रवादी नवऱ्याच्या आणि शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस (Congress) बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, असे विखे पाटील म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टोला लगावला आहे. पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विखे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात
पत्रकारांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सुजय विखे पाटील यांच्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्हाला नवरा बायको, पाहुणे अशा उपमा दिल्या जात आहेत. पण, षंढांचे काय करायचे, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बोलून फायदा नाही, असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.

 

आमदारांना मोफत घरे नाहीत
सरकारने आमदारांना मोफत घरे (MLA Free Houses) जाहीर केल्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाराज आहेत. यावर जयंत पाटालांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यावर भाष्य केले आहे. आमदारांना मोफत घरे देणार नाही, असे ते म्हणाले. बांधकाम झाल्यानंतर त्या भागात जी किंमत असेल, त्या किमतीतच आमदारांना घरे मिळणार आहेत. कोणत्याही आमदाराला मोफत घर देणार नाही, असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title :- Jayant Patil | jayant patil slams sujay vikhe over his statement on mahavikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Allu Arjun Viral News | सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनवर झाली पोलिसांकडून मोठी कारवाई, गाडीमध्ये सापडली..

 

Post Office MIS Account | दरमहा कमाई पाहिजे तर ‘या’ खात्यात 1 हजार जमा करा

 

Not Receiving Aadhaar OTP | आधार कार्ड मोबाईल क्रमांकसोबत लिंक करुनही OTP येत नाही? मग ‘हे’ करा काम, जाणून घ्या