Jayant Patil | जयंत पाटलांचे मोठे विधान; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच…’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना ‘व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी’, असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि इतर भाजप नेते (BJP leader) उपस्थित होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत (Join Shivsena) येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु झाली आहे.

जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असेही पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थिर असल्याचे सांगताना कोणतेही मतभेद नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. भाजप नेते दोन वर्षापासून असंच बोलत असून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

हे देखील वाचा

Surat Crime | कलयुग ! घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्यासाठी 18 वर्षांच्या मुलीने रचला ‘कट’; संपूर्ण कुटुंबाला खाऊ घातले विष टाकलेले पराठे

EPFO | ऑनलाइन अशा प्रकारे फाइल करा EPF नॉमिनी डिटेल; फॉलो करा ‘ही’ स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jayant Patil | ncp jayant patil bjp raosaheb danve chandrakant patil shivsena uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update