Jayant Patil On Election Commission | निवडणूक आयोग अयोग्य वागतंय, राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? या प्रकरणाबाबत जयंत पाटलांनी दिली ही माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Election Commission | आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचे सांगितले होते. पण, आयोगाने आमची बाजू न ऐकता फूट असल्याचे जाहीर केले. याबाबत आम्ही वकीलांचा सल्ला घेत आहोत. निवडणूक आयोग अयोग्य वागत आहे, असा त्याचा अर्थ दिसतो, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. (Jayant Patil On Election Commission)

ते पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे निश्चित केले आहे. पक्ष कोणाचा याचा निर्णय ६ ऑक्टोबरला आयोग घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार की अजित पवार यांचा हे ६ ऑक्टोबरला समजेल. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Jayant Patil On Election Commission)

दरम्यान, आजच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. कदाचित त्यांना दुसरी कामे असतील. त्यामुळे येणे शक्य झाले नसेल.

कंत्राटी कर्मचारी भरतीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडताना जयंत पाटील म्हणाले,
सरकारी कर्मचाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. तिथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणं चुकीचं आहे.
जबाबदारीची पदे कंत्राटी पद्धतीने भरणे अतिशय गंभीर प्रश्न आहे.
पैसे वाचवण्यासाठी बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन काही कामे करून घेतली आणि त्यात चूका आढळल्या,
तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. कंत्राटी कर्मचारी नियुक्तीला असाव्यात. अन्यथा सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवावे लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर