Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Dhangar Reservation | सध्या धनगर आरक्षणासाठी नगरमधील चौंडी येथे धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. धनगर आरक्षणावर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) येणार होते. परंतु त्यांनी अचानक दौरा रद्द केला. त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक संतापले. (Dhangar Reservation)

संतापलेल्या आंदोलकांनी निषेध करत अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच वटहुकुम निघाला नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. (Dhangar Reservation)

नगरमधील चौंडी येथे आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे यशवंत सेनेच्या वतीने १० दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांचा पाठींबा मिळत आहे. मात्र सरकाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

सरकारच्या या दुर्लक्ष करण्याच्या कृतीमुळे आज धनगर बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला.
आज सकाळपासून आंदोलक पालकमंत्र्यांची वाट पाहत होते. पण त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला.
तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. यामुळे संतप्त आंदोलकांनी राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. तसेच राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल;
नाशिक शहरात खळबळ