Jayant Patil On Shivsena | निवडणूक आयोगावर कोणाचा प्रभाव नसेल तर ठाकरेंकडेच राहिल पक्ष व चिन्ह, जयंत पाटील म्हणाले – ‘पक्षातून फुटलेले लोक…’

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Shivsena | शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह हायजॅक करण्याचा प्रयत्न पक्षातून फुटून गेलेले करत आहेत, हा मोठा विनोद आहे. निवडणूक आयोगावर कोणाचा प्रभाव नसेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडेच पक्ष व चिन्ह राहिल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर (BJP) केली. ते हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Jayant Patil On Shivsena)

 

जयंत पाटील म्हणाले, पुढार्‍यांचे काही विशिष्ट संबंध गुंतल्यामुळे ते शिंदे गटाकडे गेले आहेत. कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहेत. या पत्रकार परिषदेतला आमदार राजेश नवघरे, आमदार विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Jayant Patil On Shivsena)

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची घोषणा केली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सोबत येणे अपेक्षित आहे, अन्यथा जे सोबत येतील, त्यांच्यासोबत निवडणुका लढवणार.

 

जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर आम्हाला त्यावर काही बोलायचे नाही. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना एकत्रित लढून भाजपाला रोखण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे. यामध्ये काँग्रेसने सहभागी व्हावे,अशी अपेक्षा आहे. मात्र ते सहभागी झाले नाही आणि इतर पक्ष सोबत येत असतील तर त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवू.

फॉक्सकॉन प्रकल्पावर बोलताना पाटील म्हणाले, सुमारे पाच लाख बेरोजगारांना काम देणारा प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेला यास शिंदे सरकार जबाबदार आहे.
महाविकास आघाडीने मोठे प्रयत्न करून हा प्रकल्प राज्यात आणला होता.
मात्र, शिंदे सरकारच्या दुर्लक्षाने हा प्रकल्प इतर राज्यात गेला, त्यानंतरही त्यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
शिंदे सरकार दिल्लीकरांना घाबरले असल्याचे स्पष्ट होत आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन केले जाईल.

 

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, परदेशातून आणलेल्या चित्त्यांसाठी जंगलात जिवंत काळवीट सोडणे हा क्रुरपणा आहे.
त्या ऐवजी प्राणी संग्रहालयात ज्या पध्दतीने वाघ व इतर प्राण्यांना खाद्य दिले
जाते त्या पद्धतीने या चित्त्यांना खाद्य दिले गेले पाहिजे.

 

Web Title :- Jayant Patil On Shivsena | jayant patil state president of ncp slam eknath shinde and bjp over various issues

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Virus | पिंपरी चिंचवड शहरी भागात लम्पीचा शिरकाव, पाच जनावरांना प्रादुर्भाव; आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आढावा

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’