पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत ‘ही’ कागदपत्रे जमा करा, EPFO नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्यांना आपले Life Certificate (हयातीचा दाखला) जमा करावे लागते. त्यामुळे सर्व पेंशनधारकांना आपली पेंशन सुरु ठेवण्यासाठी दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक असते. म्हणजेच पेंशनर जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो.

हा हयातीचा दाखला पेंशनर आपल्या पेंशन असलेल्या एसबीआयच्या शाखेत जाऊन स्वत: किंवा जवळच्या एसबीआय शाखेत CSC किंवा कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये डिजिटल पद्धतीने जमा करु शकतात. आधी पेंशनरला लाइफ सर्टिफिकेट देण्यासाठी ट्रेजरीमध्ये चक्करा माराव्या लागत होत्या परंतू केंद्र सरकारने डिजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत लाइफ सर्टिफिकेट देण्याची प्रक्रियेला ऑनलाइन केली आहे. आता काही मिनिटात पेंशनर आपले लाइफ सर्टिफिकेट अपडेट करु शकतात.

1. हयातीचा दाखल एक आधार बेस्ड डिजिटल सर्टिफिकेट असते. या द्वारे पेंशनर्स आता आपल्या नजिकच्या बँक शाखेत, कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन हयातीच्या दाखल्याला आधार नंबरच्या माध्यातून बायोमॅट्रिकली ऑथेंटिकेट करावे लागेल.

2. तुमच्या पेंशन बँक खात्याला काही इतर माहिती देखील द्यावी लागते. दाखला जमा करण्यासाठी नजिकच्या बँक शाखा किंवा कॉमन सर्विस सेंटर किंवा सरकारी ऑफिसचा पत्ता jeevanpramaan.gov.in वर लोकेट सेंटर पर्यायातून मिळू शकते.

3. कर्मचाऱ्यांना पेंशन स्कीम 1995 च्या अंतर्गत सर्वांना लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक आहे. हयातीचा दाखला बनवण्याची प्रोसेस 1 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 आहे. हा दाखला देशातील सर्व पेंशनधारकांना आपल्या पेंशन असलेल्या बँक शाखेत जमा करणे आवश्यक आहे.

घर बसल्या करा अल्पाय, ही आहे प्रक्रिया –
Pensioner जीवन प्रमाण पोर्टलच्या माध्यमातून हयातीचा दाखल जमा करु शकतात. हे तुमच्या आधार नंबरशी जोडलेले असेल. यासाठी पेंशनरला पेंशन खाते असलेल्या बँक शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. जीवन पोर्टंच्या माध्यमातून आधार ई वेरिफिकेशनला हयातीचा दाखला मानण्यात येईल.

1. https://jeevanpramaan.gov.in/ वर जा.
2. पेंशनच्या कॉलममध्ये आपल्या आधारचे ई वेरिफिकेशन करावे.
3. यानंतर डिजीटल लाइफ सर्टिफिकेट (हयातीचा दाखला) जनरेट होईल.
4. हा दाखला तुमच्या लाइफ सर्टिफिकेट रिपॉजिटरीला स्टोर होईल.
5. जर तुम्ही बँकेत जाऊन आधार ई वेरिफिकेशनल करतात तर बँक अधिकारी तुमच्या दाखल्यावर स्वाक्षरी करुन देईल.

याला बँक किंवा पेंशन विभाग ऑनलाइन एक्सेस करु शकते. म्हणजेच तुमचे लाइफ सर्टिफिकेट ट्रेजरी आणि बँक दोन्हीकडे अपडेट होईल. सेंट्रल पेंशन अकाउंटिंग ऑफिसच्या मेमोरेंडमनुसार जे पेंशरधारक बँकेत जाऊन शकत नाहीत ते मजिस्ट्रेट किंवा गॅजेट ऑफिसरकडून स्वाक्षरी करुन आपला हयातीचा दाखला जमा करु शकतात. जर बँकेत पेंशन येत असेल तर बँक मॅनेजर देखील तुमचा दाखला सर्टिफाय करु शकतो.

Visit : Policenama.com