पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथे पहिला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प

जेजुरी : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील कोळविहरे येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत पहिला प्रकल्प खासदार सुप्रिया ताई सुळे व पुरंदर हवेली चे आमदार संजय जगताप यांच्या सुचनेनुसार सुरू होणार असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वय प्रविण शिंदे यांनी सांगितले .

कोळविहिरे येथे या प्रकल्पाच्या जागेची पाहणी करण्यात आली . यावेळी समनवयक प्रवीण शिंदे, पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप पोमण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील महावितरण कंपनीने चे कार्यकारी अभियंता पी जे रागीट, प्रभारी कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे, कार्यकारी अभियंता सुर्यवंशी उपकार्यकारी अभियंता बाळासाहेब फासगे ,साहेब राजेंद्र कामथे व कोळविहरे गावचे माजी सरपंच बापूसाहेब भोर, सचिन टेकवडे, विकास इंदलकर, जालिंदर खैरे ग्रामसेवक सुनील लोणकर उपस्थित होते.

यावेळी प्रविण शिंदे यांनी या प्रकल्पाची माहिती दिली तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी अंदाजे ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाला २० एकर जमीन लागणार आहे .या प्रकल्पा मुळे गावातील सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज या सौलर वर चालणार असल्याचे सांगितले . वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिवे व बेलसर येथे ३३/११नियोजित सबस्टेशन साठी च्या जागेची ही पाहाणी केली.