निरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार दत्तात्रय रामदास भिसे, वय ५२ वर्षे, व्यवसाय व्यापार, य. निरा वॉर्ड नं.२, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी निरा दुरक्षेत्र जेजुरी पोलीस स्टेशन येथे दिलेले तक्रारीनुसार ता. २३ / १२ / २०१९ रोजी रात्री १.०० वा. ते पहाटे ०४. ३० वा. चे दरम्यान मौजे निरा गावचे हद्दीत बॉर्ड नं. २ येथील त्यांचे राहते घराचे बंद खोलीचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशानेतरी उचकटुन त्याद्वारे घरात प्रवेश करून घरातील गोदरेज कपाटातील लॉकर तोडुन सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा किंमत, रूपये ८,६४,७००/- चा माल घरफोडी चोरी करून चोरून नेला आहे.

तसेच निरा शहरामध्ये इतर ठिकाणी ही चोरट्यांनी कडी कोयंडा कुलुप उचकटल्याचे समजत आहे. सदरबाबत जेजुरी पोलीस स्टेशनला घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असुन गुन्ह्याचा तपास सपोनि माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई विजय वाघमारे हे करीत आहेत. जेजुरी पोलीसांची दोन पथके तयार करून तपासकामी रवाना केली आहेत. तसेच जेजुरी पोलीसांचे वतीने पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांना जागरूक राहुन आमसुरक्षा दलाचे मदतीने रात्रगस्त करणेबाबत व आपले गावात अनोळखी इसम संशयास्पद रित्या फिरताना मिळुन आल्यास त्याबाबत पोलीसांना कळविणेबाबत आवाहन करणेत आले आहे .

गुन्ह्याचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सपोनि माने यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/