JioFiber चा नवीन युजर्सला ‘दणका’, फ्री सेवा बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ फायबर लॉन्च होण्यापूर्वी कंपनीला आपल्या ग्राहकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु व्यावसायिक लॉन्चनंतर जिओ फायबरला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याचे महत्वाचे कारण जिओचे असलेले दर हे एक आहे. त्यामुळे आता जिओ फायबरने आपल्या ग्राहकांना फ्री सेवा देणे बंद केले आहे. यासंबंधी कंपनी आता जुन्या ग्राहकांना देखील रिचार्ज संबंधी मेसेज पाठवत आहे.

अधिक नफा कमावण्यासाठी कंपनीकडून ही पावले उचलण्यात आल्याचे समजते. देशातील मोठ्या शहरातील ग्राहकांकडून जिओ फायबरने २५०० रुपये घेतले होते. मात्र आता त्यांच्याकडून देखील सेवेसाठी शुल्क आकारले जाणार आहे आणि आगामी काळात जिओ फायबर ग्राहकांकडून बिलिंग सुरु करणार आहे.

सर्वात स्वस्त प्लॅन ६९९ रुपयांचा
जिओ फायबरचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ६९९ रुपयांचा आहे. तर सर्वात महाग प्लॅन ८४९९ रुपयांचा आहे. यातून ग्राहकांना १०० mbps ते १ gbps हाय स्पीड उपलब्ध होणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त गेमिंग, व्हिडीओ कॉलिंग, होम नेटवर्क शेअरिंग अशा अनेक सुविधा मिळणार आहेत.

पाच लाख ग्राहकांना टॅरिफ प्लॅनवर करणार शिफ्ट
जिओ फायबर सुरु होताच पाच लाख ग्राहकांनी याची सेवा घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता या सर्व ग्राहकांना कंपनी टॅरिफ प्लॅनवर शिफ्ट करणार आहे. फ्री सेवा लवकरच संपणार असून पुढील सेवेसाठी जिओ फायबर प्लॅन सबस्क्राइब करा असे ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

जिओ फायबर ने सुरु केलेले प्लॅन सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसल्यामुळे कंपनीला हवा तसा रिस्पॉन्स ग्राहकांकडून न मिळाल्याने अखेर कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना शुल्क आकारायला सुरुवात केली आहे.

Visit : policenama.com