Jio यूजर्स आता देखील जुन्या प्रीपेड प्लॅनव्दारे ‘रिचार्ज’ करू शकतात, ‘ही’ आहे पध्दत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने 6 डिसेंबर रोजी आपले सर्व प्लॅन अपडेट केले आहेत. ज्यानुसार जिओचे प्रीपेड प्लॅन जवळजवळ 39 % नी महाग झालेले आहेत. मात्र आताही जिओच्या जुन्या प्लॅन प्रमाणे रिचार्ज करण्याचा एक मार्ग आहे. ट्रायच्या निर्णयामुळे अनेक कंपन्यांना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे.

ट्रायच्या नियमानुसार टेलीकॉम कंपन्यांच्या सहा महिन्यांपर्यंत टेरिफ प्लॅनला सुरु ठेवायचे होते इतर कंपन्या याचे पालन करायला तयार परंतु जिओच्या मानाने त्यांचे जुने प्लॅन ऍक्सिस करणे अवघड आहे.

याप्रकारे करू शकता रिचार्ज –
जुन्या जिओ प्लॅनसाठी आपल्या जिओ खात्यात लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, जिओ क्रमांक असलेल्या बॉक्सच्या पुढील सेटिंग्ज चिन्हावर क्लिक करा. क्लिक केल्यावर, आपला दर असलेला पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्याने जुन्या प्रीपेड योजनांची यादी मिळेल, येथे आपण आपल्या आवडीचा प्लॅन निवडून रिचार्ज करू शकता.

कोणताही ऍक्टिव्ह प्लॅन नसावा –
अशा प्रकारचे रिचार्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. टेरिफ प्रोटेक्शनचा पर्याय तेव्हाच काम करेल जेव्हा तुमचा कोणताही प्लॅन ऍक्टिव्ह नसेल. जर तुमच्या नंबर वर कोणताही ऍक्टिव्ह प्लॅन असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/