काय सांगता ! होय, Jio च्या ग्राहकांना थायलंडाला जाण्याची संधी, दिली ‘ही’ भन्नाट ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायंस जिओनं आपल्या ग्राहकांनी अशी भन्नाट ऑफर आणली आहे ज्याच्या मदतीनं आता जिओ ग्राहक थेट थायलंडला जाऊ शकतात. जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्पर्धा आणली आहे. Jio Got Talent असं या स्पर्धेचं नाव आहे.

Jio Got Talent स्पर्धेसाठी जिओनं स्नॅपटचॅटसोबत भागिदारी केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना 10 सेकंदाचा आकर्षक स्नॅपचॅट व्हिडीओ बनवायचा आहे. यासाठी ग्राहकांना एक विशेष लेन्सही देण्यात येणार आहे. Jio Got Talent या स्पर्धेत ग्राहकांना अनेक बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेतील 100 विजेत्यांना गिफ्ट म्हणून कंपनी एका महिन्याचं रिचार्ज मोफत देणार आहे. तर यातील दोन लकी विजेत्यांना थायलंडल जाण्याची संधी मिळणार आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे.

स्पर्धेविषयी काही…

सर्वात आधी स्नॅपचॅटमध्ये स्नॅपकोडला स्कॅन करा.
Jio Got Talent लेन्स ओपन करा.
आता 10 सेकंदाचा आकर्षक व्हिडीओ तयार करा.
यानंतर Our Story मध्ये तुमचा व्हिडीओ अपलोड करा.

फेसबुक पेज लाईक करा