JNU च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणे अभिनेत्री दीपिकाला पडले महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली येथील जेएनयू मध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बॉलीवूड जगतातील अनेक कलाकारांनी याची आलोचना देखील केली आहे तर आंदोलन कर्त्यांना आपला पाठींबा देखील दर्शवला आहे. मंगळवारी रात्री अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील जेएनयू आंदोलन कर्त्यांमध्ये सामील झाली होती.

जेएनयू येथे सुरु असलेल्या आंदोलनात दीपिका सोबत माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कन्हैया कुमार देखील सामील होता. यावेळी विद्यार्थ्यांनी दीपिका समोर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. यावेळी दीपिकाने कोणत्याही प्रकारचे भाषण केले नाही मात्र दीपिकाला येथे जाणे खूप महागात पडले आहे कारण येथून जाताच सोशल मीडियावर दीपिकाच्या आगामी चित्रपट छपाक बाबत विरोध सुरु झाल्याचे पहायला मिळाले.

सोशल मीडियावर सध्या #BoycottChhapaak हा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी दीपिका या आंदोलन कर्त्यांसमोर गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेता तेजिंद्र सिंह बग्गा यांनी ट्विट करून दीपिका पदुकोण आणि चित्रपटाचा बहिष्कार करण्याची मागणी केली आहे.

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका सध्या खूप मेहनत घेत आहे. अनेक टीव्ही शोज वरती दीपिका यासाठी हजेरी लावून आलेली आहे. मात्र आंदोलन कर्त्यामध्ये सामील झाल्यामुळे दीपिकाला अनेकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे.

छपाकमध्ये दीपिकाने ऍसिड हल्ला झालेल्या मुलीचा जीवन प्रवास मांडलेला आहे. विशेष म्हणजे दीपिका या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात देखील उतरलेली आहे. त्यामुळे सध्या दीपिका जोरदार पद्धतीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरताना दिसते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/