JNU हिंसाचार : ‘पहिले कुलगुरूंना हटवा’, BJP नेते मुरली मनोहर जोशींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांनी जेएनयूचे वाइस चॅन्सलर एम. जगदीश कुमार यांच्यावर मोठा हल्ला केला आहे. तसेच त्यांना पदावरून हटवण्याची मागणी देखील केली आहे.

भाजपा नेता मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले की, मानव संसाधन विकास मंत्रालयाने कुलगुरू जगदीश कुमार यांना दोन वेळेस हा वाद मिटविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट घेण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे केलेच नाही आणि आपली अडून बसण्याची वृत्ती कायम ठेवली. ते म्हणाले की, आता जगदीश कुमार यांना जेएनयूच्या कुलगुरूपदावरून हटवण्यात यावे.

जोशी यांनी ट्विट करत स्पष्ट केले की, ‘एचआरडी मंत्रालयाने दोन वेळेस जेएनयूच्या कुलगुरूंना वाढीव शुल्कावरील वाद सोडविण्यासाठी फॉर्म्युला लागू करण्यास सांगितले होते.’

मुरली मनोहर जोशी यांचे हे विधान अशा वेळेस समोर येत आहे, जेव्हा जेएनयू मधील वाढलेले शुल्क आणि हिंसेला धरून विध्यार्थी जोरदार विरोध प्रदर्शन करत आहेत. जेएनयूचे निषेध करणारे विद्यार्थी कुलगुरू जगदीश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी ठाम आहेत. विरोधक देखील कुलगुरू जगदीशकुमार यांना लक्ष करीत आहेत.

५ जानेवारी ला जेएनयू कॅम्पस मध्ये काही मुखवटा परिधान केलेल्या लोकांनी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. बीजेपी नेत्याच्या ट्विटमुळं आता सरकारवर दबाव वाढला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/