‘कोरोना’च्या सकंटकाळात देखील ‘या’ 5 क्षेत्रामध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाचे संकट हे गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठे आर्थिक आणि आरोग्य संकट आहे. यामुळे उत्पादन, रोजगारावर परिणाम झाला आहे. अशातच काही क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते प्रत्येक संकटात काही संधी सुद्धा असतात म्हणून या क्षेत्राकडे तरुणांनी लक्ष द्यावे, असं सांगितलं आहे. एका सर्वेक्षणानुसार पाच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली असून, त्याचा फायदा आता तरुणांना होणार आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशात मार्च महिण्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून रोजगार सर्वात निच्चांकी पातळीवर पोहचला होता. दरम्यान, जूनपासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सगळे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशात बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, फार्मा आणि आयुर्वेदिक औषधी या पाच क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तसेच लॉकडाऊनच्या काळात पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रांना सगळ्यात मोठा फटका बसला असून त्यात लाखो लोकांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामुळे आता नव्या संधी शोधल्या पाहिजेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, देशात मंगळवारी ५५ हजार ७९ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, एकूण रुग्णांची संख्या २७ लाख २ हजार ७४३ झाली आहे. तर ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५१ हजार ७९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६ लाख १६६ सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण १९ लाख ७७ हजार ७८० रुग्णांवर उपचार करुन सोडून देण्यात आलं आहे. त्यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ७३.१७% टक्के झाला आहे.