लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचं संयुक्‍त ऑपरेशन, 10 किलोहून जास्त RDX जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये नुकतच लष्कराने आणि पोलिसांनी मिळून केलेल्या एका मोठ्या कारवाईला यश आले आहे. मंगळवारी केलेल्या या कारवाई अंतर्गत एका बस मधून दहा किलोपेक्षा जास्त आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे. जम्मूमध्ये एका बस स्टँडच्या नजीक असलेल्या हॉटेल जवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळी पाच वाजता बिलावर येथून एक बस निघाली यावेळी एका महिलेसोबत एक व्यक्ती बस चालकाकडे आला आणि आपापसात चर्चा करून त्यांनी एक बॅग बस कंडक्टरकडे दिली. कंडक्टरने त्या बॅगेला बसमधील एका सीटखाली ठेवले. एवढ्यात लष्कराने येऊन मॉडेल अकॅडमी येथे बसला थांबवले आणि बसमधून दहा किलोपेक्षा जास्त आरडीएक्स ताब्यात घेतले आहे.

बसचे चालक तसेच कंडक्टर यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.या भागात लष्कराने स्फोटक जप्त करण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधीही मांडली येथील गावातून लष्कराने स्फोटक जप्त केली होती तसेच हत्यारे बनवणाऱ्या एका व्यक्तीला लाहडी गावातून ताब्यात घेतले होते. स्थानिक लोकांनी यावेळी सांगितले की गेल्या वेळी ज्या घरातून विस्फोटक जप्त करण्यात आले होते त्या घरापासून काही अंतरावर दहशतवाद्यांनी एका पोलिसांची हत्या केली होती.

Visit : Policenama.com