#NaginDance : आदर्श शिंदेंच्या आवाजात ‘कागर’ सिनेमातील उडत्या चालीचं नवं गाणं प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिंकु राजगुरुचा आगामी सिनेमा कागर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. त्यानंतर या सिनेमाचे एक गाणेही प्रदर्शित करण्यात आले होते. आता या सिनेमातील दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नागीण डान्स असं या गाण्याचं नाव आहे. नागीण डान्स हे उडत्या चालीचं गाणं आहे. सिनेमाच्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. तालावर थिरकायला लावणारं असं हे गाणं आहे. सध्या हे गाणं चांगलंच व्हायरल होतना दिसत आहे.

लग्न असो किंवा आणि कुठला कार्यक्रम डीजेवर नाचताना हमखास सगळे नागीण डान्स करतात. असंच एक गाणं आता कागरमध्ये पाहायला मिळणार आहे. आदर्श शिंदे आणि प्रवीण कुंवर यांनी हे गाणं गायलं आहे. वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिलं असून ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

रिंकु राजगुरु सोबत या सिनेमात शुभंकर तावडे हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकाणाभोवती या सिनेमाची कथा फिरताना दिसते. यातील प्रेमाचा संघर्षही दिसून येतो. मकरंद माने यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमातील डायलॉग रसिकांना विशेष भावताना दिसतात. हा सिनेमा 26 एप्रिल 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like