तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादावर काजोलने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. तिने नानांबद्दल केलेल्या खुलाशाबाबत अभिनेत्री काजोल हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काजोलने प्रतिक्रिया देताना सांगितले की सेक्शुअल हॅरॅसमेंट हे इंडस्ट्रिचे एक सत्य आहे. काजोलने हे ही सांगितले की फक्त इथेच नाही तर सर्वच ठिकाणी सेक्शुअल हॅरॅसमेंट असते. तिला तिच्या करिअरच्या प्रवासामध्ये कधीच अशा प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले नसल्याचे तिने सांगितले. जर कधी असं घडलं असतं तर तिने त्याबद्दल आवाज नक्कीच उठवला असता असेही तिने सांगितले. तनुश्री दत्ता ने नाना पाटेंकरांवर १० वर्षांपूर्वी गैरवर्तन केल्याचा आरोप केला असल्याच्या खुलाशामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’396f4d80-c7df-11e8-9e09-6d469c0279ec’]

एनडीटीव्हीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तनुश्री-नाना वादावर भाष्य करताना काजोलने म्हटले आहे की, ‘तनुश्रीने जे काही सांगितले ते सत्य आहे. सेक्शुअल हॅरॅसमेंट फक्त इंडस्ट्रीपुरतीच मर्यादित नसून सर्वच ठिकाणी असते. इतकेच नाही तर अनेकदा पुरुषांनासुद्धा अशा प्रकारे हॅरॅस केलं जातं, तेही याची शिकार होतात. मला माझ्या करिअरमध्ये कधीच सेक्शुअल हॅरॅसमेंटला सामोरं जायची वेळ नाही आली परंतु असं जर कधी झालंच असतं तर मी काहीतरी केलं असतं. मी याबद्दल खूप काही ऐकून आहे. तसेच या वादामध्ये काय खरं आणि काय खोटं आहे हे मला माहीत नाही.’

काजोल असेही म्हणाली की, ‘असं कधी झालं असतं तर मी त्याबद्दल नक्कीच बोलले असते. जर माझ्यासमोर असं काही झालं असतं तरीही मी नक्कीच बोलले असते किंवा काहीतरी केलं असतं. तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या आरोपानंतर #MeToo ची सुरुवात झाली. अनेकांनी तिला सपोर्ट दाखवला.’
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3effdc81-c7df-11e8-b7c3-cd690af4970b’]

तनुश्रीने नानांवर आरोप करत म्हटले होते की, ‘२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते आणि मनसेकडून धमकावले होते. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या गोष्टी सांगितल्या आहेत.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45e2dc72-c7df-11e8-9b1f-cf894d441ea8′]

कॉन्ट्रॅक्टनुसार ते गाणं सोलो होतं मात्र नाना पाटेकरांना आपल्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता असा गंभीर आरोपही तिने केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ते गाणं न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. हा प्रकार आठवला की आजही दचकते असंही तिने म्हटले आहे. २००८ साली ‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते.’

‘त्या’ प्रकरणात धनंजय मुंडे यांना काेर्टाकडून दिलासा