ब्लॉकबस्टर चित्रपट DDLJ मध्ये काजोल छोटा स्कर्ट परिधान करण्यामागे ‘ही’ स्टोरी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (DDLJ) रिलीज होऊन नुकतेच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे आणि त्यासोबतच ट्विटरवर आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचे या चित्रपटासाठी सगळे आभार मानत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीच्या (hindi film) इतिहासात असा एकही चित्रपट नाही ज्याने 25 वर्षापर्यंत चित्रपटगृहात अधिराज्य गाजवले. चित्रपटाच्या स्टोरीपासून संगीतासाठी आदित्य चोप्रा यांचे आभार मानत आहेत.

दिलवाले दुल्हनिया हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शीत झाला होता, तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकुळ घातला होता. या चित्रपटातून शाहरुख खान (shahrukh khan) आणि काजोल (kajol) या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या चित्रपटातील लव्ह स्टोरी आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज या चित्रपटाशी निगडीत एक इंटरेस्टिंग स्टोरी समोर आली आहे.

मीडिया रोपोर्ट्स नुसार, जेव्हा काजोल या चित्रपटातील गाण्याच्या शुटिंगसाठी गेली तेव्हा तिचा स्कर्ट इतका छोटा नव्हता. मीडिया रिपोर्टनुसार काजोल या गाण्याची शूटिंग करण्यासाठी गेली तेव्हा तिचा स्कर्ट थोडा मोठा होता. आदित्य चोप्राला काजोलच्या स्कर्टची लांबी आवडली नव्हती. त्यामुळे त्याने डिझायनर मनीष मल्होत्राला सांगून स्कर्ट (short skirt) कापून लहान केला होता.

जेव्हा मनीष मल्होत्राला काजोलचा स्कर्ट छोटा करत होते तेव्हा त्याच्याकडून ती जास्तच छोटा झाला. मग नाईलाजास्तव त्याच छोट्या स्कर्टमध्ये काजोलला डान्स करावा लागला होता. मात्र हे गाणं रिलीज झाल्यावर इतके हिट झाले की सर्वत्र काजोलची चर्चा होऊ लागली. यांसोबत या गाण्यात काजोल एक सीन टॉवेलमध्ये डान्स करताना दिसते. त्यासाठी काजोल कंम्फर्टेबल नव्हती. मात्र आदित्य चोप्राने समजवल्यानंतर ती या गाण्यात टॉवेल घेऊन डान्स करायला तयार झाली होती.

You might also like