Pune Crime News | पुण्यातील बिल्डरची 2.54 कोटींची फसवणूक, 3 बिल्डरसह बँक संचालक, मॅनेरज, आणि एमडी यांच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विकसनासाठी दिलेल्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पात बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे न देता पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची (Builder) 2 कोटी 54 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) 7 जणांवर गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन बिल्डर, जनता सहकारी बँकेचे (Janata Cooperative Bank) संचालक, मॅनेजर, येस बँकेचे शाखा अधिकारी, येस बँकेचे एमडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत आर आर तुपे बिल्डर्स प्रा. लि. (RR Tupe Bidders Pvt. Ltd.) चे राहुल रामदास तुपे Rahul Ramdas Tupe (वय-52 रा. मांजरी बु. ता. हवेली ) यांनी शनिवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे (VTP Urban Project) भुषण पारलेशा (Bhushan Parlesha), निलेश पारलेशा (Nilesh Parlesha), विलास थंनमल पारलेशा (Vilas Thanmal Parlesha), जनता सहकारी बँकेचे संचालक (Janata Cooperative Bank Director) संजय मुकुंद लेले (Sanjay Mukund Lele), मॅनेजर नरेश दत्तु मित्तल (Manager Naresh Dattu Mittal), येस बँकेच्या (Yes Bank) कल्याणीनगर व विमाननगर शाखेचे मॅनेजर, येस बँकेचे एमडी रणवीत गिल MD Ranveet Gill (रा. मुंबई) यांच्या विरुद्ध आयपीसी 403,406 409, 417, 420, 465, 467, 468, 471, 474, 477(अ), 506, 120 (ब), 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2016 ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत हडपसर भागातील सर्व्हे नं. 201 येथे घडला आहे. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशावरुन 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आर आर तुपे बिल्डर्स प्रा. लि. या नावाने बांधकाम व्यवसाय (Construction Business) सुरु आहे. त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली हडपसर परिसरातील सर्वे नं. 201 ही जागा व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे भुषण पारलेशा, निलेश पारलेशा, विलास थंनमल पारलेशा यांना विकसनासाठी करारनामा करुन दिली होती. ग्राहकांनी बुक केलेल्या फ्टॅटच्या रक्कमेपैकी 41.73 टक्के फिर्यादी यांना तर उर्वरित 58.27 टक्के व्हीटीपी अर्बन प्रोजेकला देण्याचे ठरले होते.

 

आरोपी पारलेशा यांनी संगनमत करुन खोटी कागदपत्रे (Forged Documents) तयार केली. तसेच त्यावर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केल्या. कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या असल्याचे माहिती असताना देखील जनता सहकारी बँकेचे संचालक संजय लेले व भवानी पेठ शाखेचे (Bhawani Peth Branch) मॅनेजर नरेश मित्तल यांनी आरोपी पारलेशा यांना फिर्यादी यांच्या खात्याचे चेकबुक दिले. फिर्यादी यांच्या खात्याचे चेक देता येत नाहीत हे माहित असताना संजय लेले आणि नरेश मित्तल यांनी आरोपींना चेकबुक दिले.

तसेच येस बँकेच्या कल्याणीनगर आणि विमाननगर शाखेच्या ब्रँच मॅनेजर यांनी खोटी कागदपत्रे वापरून
व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट या नावाने बानावट खाते काढले.
ग्राहकांच्या फ्लॅट बुकींगच्या वेळी व फ्लॅट अग्रीमेंट करण्याच्या आगोदर फिर्यादी यांची परवानगी,
संमती व ग्राहकांच्या बुकींग संमतीपत्रावर सही घेणे बंधनकारक होते. मात्र, आरोपींनी तसे न करता
फिर्यादी यांच्या हिस्स्याची 2 कोटी 54 लाख 69 हजार 896 रक्कम न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
दरम्यान, याबाबत फिर्यादी राहुल तुपे यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
न्यायालायाने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी
सीआरपीसी कलम 156 (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | 2.54 crore defrauding Pune builder,
FIR against 3 builders along with bank director, manager, and MD

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा