हिंदू शब्द हा भारताचा नाही – कमल हसन ; भारतीय हीच आपली ओळख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्याकडून नेत्याकडे प्रवास करणारा कमल हसनने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करून सांगितलं कि, हिंदू शब्द हा भारताचा नाही. हा शब्द आपल्याला मुघलांनी दिला आणि नंतर इंग्रजांनी त्यांच्या राज्यात हा शब्द प्रचलित केला.

त्यांनी म्हंटले कि हिंदू हा शब्द विदेशी हल्लेखोरांनी आणि मुघलांनी दिला आहे. हिंदू शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपण भारतीय असेच संबोधन केले पाहिजे असेही मत त्यांनी नोंदवले आहे. हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणं गैर आहे आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे असेही कमल हासन यांनी म्हटले आहे.हसन यांनी ट्विटरवर तामिळ भाषेतील म्हणीचा वापर करत म्हंटले कि, सहकार्याने राहण्यामध्येच अनेकांचे हीत आहे.

तत्पूर्वी, नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे विधान कमल हसन यांनी केले होते. या विधानावरून बरेच वादंग उभा राहिले होते. नंतर त्यांनी सर्वच धर्मात दहशतवादी असतात असे देखील मत व्यक्त केले.